Old Car Buying Tips: जुनी इलेक्ट्रिक कार खरेदी करताय? ‘या’ गोष्टींकडे लक्ष न दिल्यास होईल नुकसान

Second Hand Electric Car Buying Tips: गेल्याकाही वर्षात इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, या गाड्यांची किंमत खूपच जास्त असल्याने प्रत्येकाला खरेदी करणे परवडत नाही. अशावेळी ग्राहक जुन्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळतात. मात्र, जुनी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
बजेट
कोणतीही गाडी खरेदी करण्याआधी बजेट ठरवणे गरजेचे आहे. अनेकदा गाडीच्या कंडिशनच्या तुलनेत जास्त पैसे मागितले जातात. त्यामुळे गाडी किती वर्ष जुनी आहे, त्याचे फीचर्स आणि इलेक्ट्रिक कारमधील बॅटरी कंडिशन हे सर्व पाहूनच गाडीसाठी पैसे खर्च करावेत.
बॅटरी
इलेक्ट्रिक कारमधील सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गाडीची बॅटरी. इलेक्ट्रिक कार फुल चार्जमध्ये किती अंतर पार करू शकते हे बॅटरीवर अवलंबून असते. त्यामुळे जुनी इलेक्ट्रिक कार खरेदी करताना बॅटरीची स्थिती नक्की तपासा. इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे गाडी खरेदी केल्यानंतर बॅटरी चांगली नसल्यास यासाठी पुन्हा हजारो रुपये खर्च करावे लागू शकतात.
मालकी हक्क
कार खरेदी करताना संबंधित कागदपत्रे तपासून घ्यावे. कारवर कोणतेही कर्ज अथवा दंड तर नाही हे तपासा. तसेच, पैशांचा व्यवहारासोबतच मालकी हक्क देखील तुमच्या नावावर ट्रान्सफर होतील याची खबरदारी घ्या.
सर्व्हिस हिस्ट्री
अनेकजण गाडीची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. वेळेवर सर्व्हिसिंग देखील करत नाही. वेळेवर सर्व्हिसिंग न केल्याने गाडीचे पार्ट्स खराब होतात. त्यामुळे गाडी खरेदी करताना सर्व्हिसिंग वेळोवेळी झाली आहे की नाही, याची माहिती घ्या. सर्व गोष्टी तपासल्यानंतरच सर्व व्यवहार पूर्ण करा.





