‘वेळ बदलते, जग बदलतं…’; अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले विचार

Amitabh Bachchan Blog | अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ब्लॉगद्वारे ते आपले विचार अनेकदा मांडतात. याशिवाय एक्स अकाऊंटवर ते पोस्ट शेअर करतात. आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगद्वारे आपले विचार मांडले आहेत. ज्यात त्यांनी बदलती वेळ आणि वेळेनुसार बदलत्या लोकांबद्दल लिहिले आहे.
या ब्लॉगची सुरुवात त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींसोबत केली. ‘तुमने हमें पूज पूज कर पत्थर कर डाला, वो जो हम पर जुमले कसते हैं, हमें जिंदा तो समझते हैं’ (माझी पूजा करून तू मला दगड बनवलंस. जे माझी थट्टा करतात, त्यांना किमान मी जिवंत तरी वाटतो). Amitabh Bachchan Blog |
या ब्लॉगमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘वेळ बदलते, जग बदलतं, वागणूक, सवयी बदलतात, संस्कृती बदलते, लोक बदलतात. जी लोकं तेव्हा होती, ती आता नाहीत आणि आता लवकरच जी लोकं आता आहेत, ती तेव्हाचे संदर्भ बनतील. भूतकाळात जगणं निरर्थक आहे आणि भूतकाळ फक्त आठवणी म्हणून जपलं पाहिजे,’ असंही त्यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिले आहे. Amitabh Bachchan Blog |
हेही वाचा:
आजही पावसाची कोसळधारा! मुंबई-पुण्यासह बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, अलर्ट जारी





