दहाव्या षटकात जेमी ओवर्टन गोलंदाजीसाठी आला असता, तिलक वर्माने त्याला पहिल्या दोन चेंडूंवर दोन खणखणीत चौकार लगावले. त्यानंतर षटकातील एका चेंडूवर धाव घेताना दोघांमध्ये खुन्नस पाहायला मिळाली. असे मानले जात आहे की, जेमी धावत येत असताना (Run-up) तिलक वर्माने आपण तयार नसल्याचे सांगत त्याला मध्येच थांबवले होते. वारंवार होणाऱ्या या अडथळ्यामुळे जेमीचा संयम सुटला आणि षटक संपल्यानंतर दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली.
\n\n\n\n🚨FIGHT BETWEEN TILAK VARMA AND JAMIE OVERTON🚨
\nTilak called for 2 runs.
\nJamie: Why didn’t you run 2?
\nTilak: Can’t you see the fielder?
\nJamie: “He was far behind”
\nTilak: “He was already halfway”
\nJamie: “Don’t argue”
\nTilak: “Go from here”#MIvsCSK pic.twitter.com/Bzsv5oLo1x
\n— Ajay Jadeja (@AjayJadeja171) April 24, 2026
\nया वादाचा परिणाम तिलकच्या एकाग्रतेवर झाला की काय, असे वाटत असतानाच तो ३७ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे, या सामन्यात मुंबईच्या एकाही फलंदाजाला चेन्नईच्या अचूक गोलंदाजीपुढे तग धरता आला नाही. केवळ तिलक वर्मा (३७) आणि सूर्यकुमार यादव (३६) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरल्याने मुंबईला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर दोघे एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसली. मात्र, आता या गैरवर्तणुकीबद्दल बीसीसीआय या दोघांना काय शिक्षा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.