Tilak Varma : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ३०वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात (Tilak Varma) खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर हंगामातील दुसरा विजय नोंदवला. विशेष म्हणजे, तिलक वर्माने शतकी खेळी (Tilak Varma) करत मुंबईला हंगामातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून दिला. सलग चार पराभवांनंतर मुंबई इंडियन्सला हा विजय मोठा आत्मविश्वास देणारा ठरला आहे. सामन्यात फलंदाजीत तिलक वर्मा तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह यांनी चमकदार कामगिरी केली. (Tilak Varma) Tilak Varma सामन्यात काय घडले? नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात फलंदाजीला खराब झाली, पण तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी डाव सावरला. तिलक वर्माने (Tilak Varma) केवळ ४५ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा ठोकल्या. त्यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ बाद १९९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा डाव पूर्णपणे कोसळला. संघ केवळ १५.४ षटकांत १०० धावांवर सर्वबाद झाला. यामुळे मुंबई इंडियन्सने ९९ धावांच्या फरकाने विजय मिळवला. हा मुंबई इंडियन्सचा धावांच्या फरकाने चौथा सर्वात मोठा विजय ठरला. तिलक वर्माचा मोठा खुलासा सामन्यानंतर तिलक वर्माने (Tilak Varma) जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत एक मजेदार प्रसंग सांगितला. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान कर्णधार हार्दिक पांड्या मैदानात आला होता. तो खूप उत्साही आणि जोशात होता. तो सतत तिलकला “तू करू शकतोस, तू नक्की करशील” असे म्हणत होता. तिलक म्हणाला, “सर्वांनाच माहिती आहे की हार्दिक किती उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. पण त्या वेळी मला शांत राहून माझ्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे होते. त्यामुळे मी त्याला ‘शांत हो’ असे सांगितले आणि ‘मी सगळं सांभाळतो’ असेही म्हटले.” तिलकची खेळपट्टीवर वेळ घालवण्याची रणनीती तिलक वर्माने पुढे सांगितले की, गेल्या काही सामन्यांत त्याला जास्त वेळ फलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात खेळपट्टीवर जास्त वेळ घालवणे आणि डाव सावरणे हे त्याचे मुख्य लक्ष्य होते. त्याने ही रणनीती यशस्वी केली आणि शतक झळकावले. बुमराहची शानदार गोलंदाजी गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी केली. त्याने ४ विकेट्स घेतल्या. सुरुवातीची ओव्हर टाकण्याचा कर्णधाराचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. बुमराहचा फॉर्म परत येत असल्याचे चिन्ह मुंबई इंडियन्ससाठी मोठी सकारात्मक बाब मानली जात आहे. हा विजय मुंबई इंडियन्ससाठी हंगामात पुनरागमन करण्याची संधी निर्माण करणारा ठरला आहे. सलग चार पराभवानंतर आलेला हा दमदार विजय संघाच्या आत्मविश्वासाला नक्कीच बळ देईल.