टिळक महाराष्ट्र विद्यालय आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न

पुणे –केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) हे भारतातील सर्व शाळांसाठीचे राष्ट्रीय शिक्षण मंडळ आहे. केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक अभ्यासक्रम शाळांमध्ये चालवण्यासाठी सीबीएससी ची मान्यता असणे आवश्यक असते.
ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण हेतूने सुरू करण्यात आलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयात (Tilak Maharashtra Vidyalaya) मागील महिन्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तपासणी करण्यात आली होती. शालेय इमारत, मैदान, शाळेतील कर्मचारी व शिक्षक वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, भौतिक शालेय सुविधा या सर्व निकषांना पूर्ण करण्यात आल्याने टिळक महाराष्ट्र विद्यालयाला माध्यमिक स्तरापर्यंतची सीबीएससी मंडळाची मान्यता मिळाली आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रणती टिळक (Director of Tilak Maharashtra Vidyalaya Dr. Pranati Tilak) यांनी सीबीएससी मान्यता क्रमांक 1131381 असल्याचे जाहीर केले. यापुढे विद्यालयातील सर्व शिक्षकांना सीबीएससीचे प्रशिक्षण लाभणार असून त्याद्वारे मुलांचा शैक्षणिक विकास निश्चित होणार आहे. शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रणती टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या एकत्रित कार्यातून हे यश शाळेला प्राप्त झाले आहे.



