अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या जोडीच्या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या रिलीजचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. आज चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे. याशिवाय या चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
View this post on Instagram
‘बडे मियाँ छोटे मियाँ’मधील अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा फर्स्ट लूक समोर आला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये दोन्ही सुपरस्टार बुलेटप्रूफ ढाल कॅरी केलेले आणि हातात बंदुका घेतलेल्या धमाकेदार लूकमध्ये दिसत आहेत. हे पोस्टर रिलीज करण्यासोबतच या चित्रपटाचा टीझर कधी रिलीज होणार हे देखील निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे.
पोस्टर रिलीजसोबतच्या कॅप्शनमध्ये, अक्षय आणि टायगरने वचन दिले की बडे मियाँ छोटे मियाँ अॅक्शन प्रेमींसाठी एक मेजवानी असेल आणि टीझरच्या रिलीजची तारीख देखील आऊट केली. कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की “मोठ्या पडद्यावर माझ्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी परत – ऍक्शन #बडे मियाँ छोटे मियाँ टीझर 24 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. बडे मियाँ छोटे मियाँ ईद 2024 ला.”
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि गोविंदा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपर-डुपर हिट ठरला.