मुंबई – यशराज निर्मिती असलेला टायगर 3 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाण सिनेमात देखील सलमान खान दिसून आला होता. तेव्हापासून टायगर सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. टायगरच्या तिसऱ्या पार्टने रिलीजपूर्वीच शंभर कोटींचा टप्पा पार केल्याचे वृत्त समोर आले आहे.
शाहरुखच्या पठाण प्रमाणेच सलमानचा टायगर 3 हा सिनेमा मोठा असणार आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है हे दोन्हही चित्रपट सुपरहिट झाले होते. त्यामुळे टायगर 3 कडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशात पठाणमध्ये सलमान खान दिसल्याने टायगरमध्ये देखील शाहरुखची एंट्री होणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशात कमाईच्या बाबतीत टायगरने पठाणला देखील मागे टाकले आहे.
टायगर 3 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत आहे. सलमान आणि कतरीना या चित्रपटात सोबत दिसणार आहेत.अशात टायगर 3 चे वेब राईट्स अमेझॉन प्राईमने विकत घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. प्राईमने टायगरचे राईट्स पन्नास नाही शंभर नाही तर तब्बल दोनशे कोटींना विकत घेतले असल्याचे समोर आले आहे.