अहिल्यादेवींच्या प्रतिमेवर दोन टन भंडाऱ्याची उधळण

बारामती शहरात भव्य मिरवणूक : दांडपट्टा, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक
बारामती – राष्ट्रमाता पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीचे औचित्य साधून बारामती शहरात शिवसूर्य शस्त्र विद्या संवधर्न बारामती यांच्या वतीने लाठी, काठी, दांडपट्टा, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक करून राजमाता अहिल्यादेवी मॉंसाहेब यांना मानवंदना दिली. यावेळी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. फटाक्याची आतिषबाजी करीत फायर मशीनद्वारे 2 टन भंडारा व पिवळ्या पताकाची उधळण करण्यात आली.
राष्ट्रमाता पुण्यशलोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान बारामती व संस्थापक अध्यक्ष निलेश रवींद्र धालपे व मित्र परिवार यांच्या वतीने शहरात 5 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शहरातील पांढरीचा महादेव येथे अभिषेक घालण्यात आला. पुण्यशलोक अहिल्यादेवींच्या मूर्तीचे पूजन विश्वास देवकाते, दत्तात्रय येळे, सुधीर पाटसकर, सचिन सातव, पांडुरंग कचरे, सुभाष ढोले, ऍड. कोकरे, संपत टकले, सनी देवकाते, सत्यव्रत काळे, नवनाथ पडळकर, अजित मासाळ, तानाजी कचरे, दिग्विजय तुपे, अमोल यादव, विनोद पवार, संदीप देशपांडे, सुधाकर पांढरे, डॉ. वासुदेव पिसे, बापू थिटे, पितांबर सुभेदार, अभिजित डफळे, वसंत घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वृक्षारोपण, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयंतीनिमित्त अहिल्यादेवींची मूर्ती बसवण्यात आली होती. नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश धालपे, आशिष घोरपडे, आनंद खुळपे, अश्विन भोकरे, अनिकेत धालपे, स्वप्निल खरात, रोहित पिसे, नागेश नागे, सुनील कोकणे, अक्षय कुलकर्णी यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.





