Video | उर्से टोलनाक्‍यावर दरोडेखोरांसोबत पोलिसांची चकमक, 8 जण जेरबंद

Updated On:
Video | उर्से टोलनाक्‍यावर दरोडेखोरांसोबत पोलिसांची चकमक, 8 जण जेरबंद

पिंपरी (प्रतिनिधी) – मध्य प्रदेशातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंगावर मोटारी घातल्या. तरी देखील पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आठ दरोडेखोरांना जेरबंद केले. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी साडेअकराच्या सुमारास उर्से टोलनाक्‍यावर घडली.

लोकेश चौहान (वय 35), भवानी हनुमंत चौहान (वय 40), निखिल घेकरसिंग गोडन (वय 34), कमलसिंग सुघनसिंग हाडा (वय 61), अंतिम कल्याण सिसोदिया (वय 23) कुंदन चौहान (वय 33), अरविंद चौहान (वय 35), संजय गुदेन (वय 32, सर्व रा. देवास, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर, दोघेजण पळून गेले आहेत. तर गुंडा विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी शुभम कदम हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून महामार्गावरून जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, उर्से टोलनाक्‍यावर सापळा रचला. पोलिसांनी संशयित दोन मोटारी अडविण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले. अन्य तीन जणांनी महामार्गावरून विरुद्ध दिशेने सुमारे एक किलोमीटरपर्यंत मोटार दामटली.

पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून आरोपींनी मोटार सोडून डोंगरात पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्यासह गुंडा विरोधी आणि सामाजिक सुरक्षा विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पथकाने डोंगर पिंजून लपून बसलेल्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच, रात्री उशिरापर्यंत त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू होता.

कदम यांच्या धाडसाचे कौतुक

आरोपी अंगावर मोटार घालत असतानादेखील पोलीस कर्मचारी कदम मागे हटले नाहीत. मोटारीने उडवल्यानंतर कदम मोटारीचे बॉनेट धरून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या अंगावरून मोटार पुढे गेली. दोन चाकांच्या मधोमध झोपल्याने ते थोडक्‍यात बचावले.

दरम्यान, त्यानंतर उर्से टोल नाका येथे गुरूवारी मध्यप्रदेशातील दरोडेखोरांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेले पोलीस कर्मचारी शुभम कदम यांची पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

आणखी संबंधित बातम्या

Kamshet Garbage Issue: कामशेतच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य! दुर्गंधी आणि मोकाट कुत्र्यांमुळे प्रवासी त्रस्त...कारवाई कधी होणार?

2026-10-04 02:00:33

Kamshet Garbage Issue: कामशेतच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य! दुर्गंधी आणि मोकाट कुत्र्यांमुळे प्रवासी त्रस्त...कारवाई कधी होणार?

Rahul Gandhi : ‘2029 मध्ये तुम्ही पंतप्रधान व्हा’; धारच्या तरुणाची शायरी ऐकून राहुल गांधी म्हणाले, ‘I LOVE YOU’

2026-09-19 23:03:02

Rahul Gandhi : ‘2029 मध्ये तुम्ही पंतप्रधान व्हा’; धारच्या तरुणाची शायरी ऐकून राहुल गांधी म्हणाले, ‘I LOVE YOU’

Rahul Gandhi Indore Visit : राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल; स्वागतासाठी विमानतळाबाहेर गर्दी, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

2026-09-19 16:18:35

Rahul Gandhi Indore Visit : राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल; स्वागतासाठी विमानतळाबाहेर गर्दी, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

2026-09-19 12:18:53

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

Tanker Accident: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! पाम तेलाचा टँकर उलटून लागली भीषण आग...असा वाचला चालक

2026-08-30 02:00:30

Tanker Accident: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! पाम तेलाचा टँकर उलटून लागली भीषण आग...असा वाचला चालक