जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार; संगमनेरमधील घटना
Updated On:

संगमनेर – संगमनेरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या पित्याने पोटच्या 11 वर्षीय मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पत्नीने पोलिसात पतीविरुद्ध फिर्याद दिली असून संगमनेर पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.
आई-वडिलांसोबत राहणाऱ्या संबंधित ११ वर्षीय पिडीतेची आई बाहेरगावी गेली होती. या काळातच, २२ जुलैच्या रात्री, २८ जुलैच्या रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर, असे तीन वेळा पित्याने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी झोपलेली असताना तिच्याशी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.




