काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा
Updated On:

श्रीनगर: काश्मिरात कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी या जिल्ह्यातील नगनाड भागात ही चकमक झाली.
या ठिकाणी दहशतवादी ज्या भागात लपले होते त्याला वेढा देऊन सुरक्षादलांनी त्यांची शोध मोहीम हाती घेतली तेव्हा ही चकमक उडाली. दुपारी उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. त्यात तीन दहशतवादी मारले गेले. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलांनी गुप्तचरांचे जाळे अधिक व्यापक केल्याने त्यांना त्या भागात आलेल्या दहशतवाद्यांची माहिती त्वरित मिळत असल्याने त्यांच्या विरोधतील मोहिमेत अलीकडच्या काळात मोठे यश येत आहे. सुरक्षा जवानांकडून सतत महत्त्वाचे दहशतवादी टिपले जात असल्याने दहशतवाद्यांच्या संघटनांचे कंबरडे मोडले आहे.





