पाच नोव्हेंबरला आणखी तीन राफेल येणार
Updated On:

नवी दिल्ली – चीनबरोबर लडाखमध्ये तणावाची पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात तीन राफेल विमाने पाच नोव्हेंबर रोजी दाखल होत आहेत. राफेल विमानांची पहिली तुकडी 29 जुलैला दाखल झाली होती ती विमाने हवाइ दलाच्या अंबाला येथील तळावर 10 सप्टेंबरपासून कार्यरत झाली आहेत.
राफेलची 36 विमाने पुरवण्यासाठी भारताने फ्रान्ससह 59 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. 4.5 जनरेशनची ही विमाने हॅमर क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. मेटेओर, स्कल्प ओण एमआयसीए सारख्या दीर्घपल्ल्याची क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत.





