पुणे – शहरात गेल्या 24 तासांत करोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयातील 2 तर केईएम रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मृतांची संख्या 65 झाली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गुरुवारी (दि.23) रात्री या तिघांचा मृत्यू झाला असून, दोन महिला आणि एक पुरुष आहे. पर्वती दर्शन येथे राहणारी 61 वर्षीय महिलेला 19 एप्रिल रोजी त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काल रात्री त्यांचा मृत्यू झाला.
शिक्रापूर येथील 40 वर्षीय व्यक्तीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचाही रात्री मृत्यू झाला असून किडनीचा त्रास होता. तसेच केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या 30 वर्षीय महिलेचा उपचादरम्यान मृत्यू झाला. तिच्या घश्यातील नमुने तपासणीसाठी पाठविले असता, अहवाल आज पॉझिटिव्ह आला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.