आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Updated On:

मुंबई (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारने शनिवारी आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक कार्य विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी विनिता वेद सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने गेले काही दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. शनिवारीही त्यांनी तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन विटणकर यांची नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी, तर विजय सिंघल यांना आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन मुंबई या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.





