मांजरीत तीन लाखांची दारू जप्त

श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नगर – आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने राहुरी तालुक्‍यातील मांजरी शिवारात छापा टाकून 3 लाख 29 हजार 184 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.

अशोक तुकाराम विटनोर असे आरोपीचे नाव आहे. आगामी विधान सभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपाधीक्षक सी.पी.निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक के.यु. छत्रे, पी बी अहिरराव, ए.सी खाडे, नम्रता वाघ, तसेच राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे व महिला जवान वर्षा जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

राहुरी तालुक्‍यातील मांजरी शिवारात अवैध दारू वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचवून गुरुवार (दि.19) रोजी पाहटे दोन वाजल्याच्या सुमाराच कारवाई केली. या कारवाईत देशी विदेशी मद्याचे 74 बॉक्‍स जप्त करण्यात आले आहे. त्याची अंदाजे 3 लाख 29 हजार 184 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल पाटील हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.