पुणे जिल्हा | तीन लाख रुपय लोकवर्गणी ; आईचे बन फेज टू

पारगाव, (वार्ताहर) – देलवडी (ता. दौंड) ग्रामस्थ व जय मल्हार ग्रंथालय व वाचनालयाच्या संचालक मंडळांनी सव्वातीन लाख रुपये जमा करत देलवडी येथे आईचे बन फेज टू साकारले आहे. याचे उद्घाटन दौंडचे तहसीलदार अरूण शेलार यांचे हस्ते करण्यात आले.
कोविड कालावधीत म्हणजेच 3 वर्षांपूर्वी गावातील तरुणाई एकत्र आली. उच्चशिक्षित युवकांनी उजाड माळरानावर 600 झाडांचे आईचे बन साकारले. त्यावेळी अवघ्या महिन्याभरात 4 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली.
गावातील प्रत्येक कुटंबातील व्यक्तीने आपल्या आईच्या नावे प्रेमाखातर प्रत्येकी एक झाड दिले म्हणून या प्रकल्पाला आईचे बन असे नाव देण्यात आले. आत्ता 4 वर्षार्ंनंतर आईच्या बनाच्या पुढच्या टप्यातील वृक्षारोपणासाठी 3 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी व जय मल्हार विद्यालय देलवडी या शाळेच्या स्थापनेपासूनच्या सर्व शिक्षकांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित आजी माजी शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, पंढरीनाथ भाडळे, दत्तात्रय पवार, कुसुम डोंबाळे, दिलीप खवळे, सुभाष बांदल, अनिल नवले, आनंद भोसले, उत्तम जावळे, माधवी सोमवंशी, हर्षल देशमुख, ऊषा आडागळे, सुदर्शना शेलार, छगन खळदकर, सुजाता जावळे, भास्कर वाबळे, सुनील चौधरी, विक्रम बेंद्रे, चंद्रकांत कोकडे,
विष्णु शिंदे, संपत कदम, रुपेश पोमणे, शिवदास शिंदे, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बनामध्ये पाणीपुरवठा व श्रमदान करणार्या अनिल शेलार, दत्तात्रय शेलार,राजेंद्र बंड ,सचिन शेलार,प्रकाश जाधव,मंगेश भालेराव, योगेश भोसले, गणेश शेलार, दीपक देसाई, हेमंत शेलार यांचा सत्कार करण्यात आला.





