काबुलमध्ये गोळीबारात तीन जण ठार
Updated On:

काबूल : अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये रविवारी गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन जण ठार तर एक जखमी झाला आहे.
वृत्तसंस्था सिन्हुआने एका काबुल पोलिस अधिका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, घटनेत लोगर विभाग समितीचे सदस्य नासिर गरात आणि त्यांचे दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले असून, त्यांचा चालक जखमी झाला आहे.”
गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
रविवारी झालेल्या या घटनेची जबाबदारी सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

