कोल्हापूर – कोल्हापूर मध्ये मोठया प्रमाणावर शस्त्रे सापडली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन बंदुका, ३७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात धनगरवाडा या परिसरात ही शस्त्रे सापडली असून या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
कोल्हापूरच्या पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत रवींद्र नाईक, फारूक पटेल या स्थानिकांना बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्या प्रकरणी, तर बेळगावच्या बाळू सुतार आणि सिंधुदुर्गच्या निलेश परब यांना शस्त्रे पुरवल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.