बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणी तीन जणांना अटक; नागपूर पोलिसांची कारवाई

Nagpur News | नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमधील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरण समोर आले. त्यावर आता नागपूर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारावर अनुभव नसताना मुख्याध्यापकपदी मान्यता देऊन शालार्थ आयडी तयार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली.
नागपूर पोलिसांनी निलेश मेश्राम, अधीक्षक वर्ग दोन, माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय, संजय दुधाळकर, शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि सुरज नाईक, वरिष्ठ लिपिक शिक्षण उपसंचालक कार्यालय या तिघांना अटक केली आहे. तिघेही आरोपी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी आहे.
580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती
नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करून त्यांच्या वेतनासाठी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा फटका बसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत बोगस मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती.
आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनवण्यात आले होते. बनावट शिक्षक नियुक्त प्रकरणात यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित केले आहे. Nagpur News |
तसेच त्यांच्या नियुक्तीला नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने प्रदान करण्यात आले. त्यामुळे बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष नियमबाह्य पद्धतीने वेतन देऊन शासकीय तिजोरीला मोठा नुकसान पोहोचवल्याचे स्पष्ट होत आहे. Nagpur News |
हेही वाचा:





