IPL Betting : आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या तिघांना अटक

मुंबई : आयपीएलच्या लढतींवर सट्टेबाजी करणाऱ्या तिघांना नवी मुंबईतील सानपाडा भागातून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकराणामध्ये 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांकडून अडीच लाखाहून जास्त रक्कमेचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, गुप्त माहितीच्या आधारे सानपाडा येथील एका सोसायटीतील रूममध्ये सट्टेबाज कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या अधारे पोलीसांनी संबंधीत सोसायटीमधील त्या रूमवर धाड टाकली असताना, तिनही आरोपींना रंगेहात पकडले.
पोलिस निरीक्षक नीरज चौधरी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, या छापेमारीत २.६६ लाख रुपयांचे इलेक्ट्रोनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून आरोपींच्या विरोधात आरोपीविरुद्ध ‘महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा’ आणि ‘माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्या’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेटिंग रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.





