विनयभंग अन् नापास करण्याची धमकी
Updated On:

पिंपरी – एका तरुणीचा पाठलाग करून वारंवार विनयभंग करणाऱ्या आणि आपली विद्यापीठात ओळख सर्व विषयांत नापास करतो, अशी धमकी देणाऱ्या इसमावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पिंपळे गुरव परिसरात घडली. चंद्रकांत काशिनाथ जाधव (वय 45, रा. पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत 20 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2018 ते 14 मे 2020 या कालावधीत घडली. आरोपी जाधव हा वेळोवेळी फिर्यादी तरुणीचा पाठलाग करीत असे. तुला सर्व विषयात नापास करतो, अशी धमकीही फोन करून आरोपीने फिर्यादी तरुणीला दिली. याबाबत तरुणीने जाब विचारला असता तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.-





