Mumbai : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी; पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअॅप मेसेज, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
Updated On:

मुंबईः बुधवारी मुंबई वाहतूक पोलिसांना व्हाट्सअॅपवरून मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालावर हल्ला करण्यात येईल, अशी धमकीचा मेसेज आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धमकेच्या मेसेजमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून धमकी देणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहे. ही धमकी व्हॅाट्सअॅप मेसेजद्वारे देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅाट्सअॅपवरून मेसेज करणाऱ्या व्यक्तीचे नाव शहाबाज हुमायून राजा देव असे असल्याचे सांगितले जात आहे. एका पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा मेसेज आला होता. या प्रकरणी पोलीस यंत्रणा अलर्ट झाला असून धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.





