Crime News | शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आमदार संजय गायकवाड धाकटा मुलगा मृत्यूंजय गायकवाड याच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा अशाच प्रकारचं पत्र गायकवाड यांना मिळालेलं आहे. आता तिसऱ्यांदा हे पत्र मिळाल्यानंतर गायकवाड यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आहे. नाही. पत्रात नेमकं काय लिहिलं आहे? तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण की, तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे. तुमचे जुने सहकारी समाधान मोरे व त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्यामुळे तुमचा धाकटा मुलगा मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्याची सुपारी घेतली असून ते त्या कार्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यांची अशी एक मिटिंग देखील झाली आहे. तरी आपण व आपले कुटुंब त्यांचे रक्षण करावे. मी त्याच्या जवळची व्यक्ती असून मी प्रकट स्वरूपात येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे. वेळ निघून गेल्यावर काहीही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. तुमचे आणि माझे ही. शिवरायांच्या चरणाची शपथ हा मजकूर खोटा नाही, आपण सतर्क राहावे.” या पत्राच्या शेवटी अज्ञात व्यक्तीने टीपही लिहिली आहे. त्याने टीपमध्ये लिहिलं की, पत्रातील मजकूर हा खोटा नसून हा सत्य आहे. यामध्ये माझा कोणताच वैयक्तिक फायदा नाही. केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजी आहे, म्हणून पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे. मृत्यूंजय दादांची काळजी घ्या, आई भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना, आपला शुभचिंतक असा मजकूर या पत्रामध्ये लिहण्यात आलेला आहे. दरम्यान, हे पत्र कोणी पाठवलं हे अद्याप समोर आलेले नाही. हेही वाचा : आळंदी : माऊलींच्या ७५०व्या जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन; व्हाट्सअॅपवर करा नाव नोंदणी