शिरूर । कवठे येमाई येथे भावाला व चुलत भावाला शिवीगाळ करू नको. असे समजावून सांगत असताना समजावून सांगणाऱ्यालाच दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यात सुनील भाऊ गाडेबैल हे जखमी झाले आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे संभाजी गंगाराम गाडेबैल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २७ ऑगस्टला रात्री ७.३० वाजताच्या सुमारास कवठे येमाई येथील गाडेबैल वस्ती येथे चारंगबाबा देव यांचा उत्सव होता. यादरम्यान सुनील गाडेबैल यांच्या ओळखीचा व्यक्ती संभाजी गंगाराम गाडेबैलने तेथे उपस्थित गणेश बापु गाडेबैलला शिवीगाळ करत केली. यानंतर सुनिल गाडेबैल गंगारामला समजावून सांगू लागला, मात्र गणेशने रागाच्याभरात सुनिल यास शिवीगाळ दमदाटी केली. हातात मावेल असा दगड घेवुन त्याच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारून दुखापत करून, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक माडगे करत असून एकावर गुन्हा दाखल झाला आहे.