तेहरान – अनेक मुस्लीम देशांमध्ये महिलांसाठी कडक कायदे आहेत. इराणमधील महिलांवरही असेच कडक कायदे लावण्यात आलेले आहेत. मात्र आता त्या कायद्यांना विरोध केला जात असून त्याच्या विरोधात महिला आवाज उठवत असल्याचे निदर्शनास येते आहे.
त्याचाच एक भाग म्हणून या महिलांनी रस्त्यावर उतरून हिजाबला विरोध केला आहे. आम्ही काय पेहराव करायचा, याचे स्वातंत्र्य आम्हाला हवे अशी मागणी करत या महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार मंगळवारपासूनच या आंदोलनांना सुरुवात झाली आहे.
मंगळवारी इराणमध्ये आंतरराष्ट्रीय हिजाब दिवस साजरा होत होता. त्याचदिवशी देशभरातील महिला रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. मंगळवारी झालेल्या मुख्य आंदोलनात महिलांनी रस्त्यावर येत हिजाब फेकून दिले. आपापल्या घरातून हे हिजाब आणून ते सार्वजनिक रस्त्यांवर फेकण्यात आले.
इंधनाच्या खरेदी – विक्री किमतीतील तफावत वाढली; तेल कंपन्यांना होणार तोटा
या आंदोलनाचा व्हिडिओदेखील महिलांनी रेकॉर्ड केला. अमेरिकेतील हिजाब विरोधी कार्यकर्ते मसीह अलीनेजाद यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ट्विटरवरून सर्वप्रथम त्यांनीच या आंदोलनाची हाक दिली होती. इराणने हिजाबच्या सक्तीबाबत केलेला कायदा अमानवी असून तो लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी महिलांनी केली.
राष्ट्रपती निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर; यशवंत सिन्हा यांचा आरोप