पुण्यातही हजारो किलो अंमलीपदार्थ नष्ट

पुणे : आझादी का अमृत महोत्सव (एकेएएम) उत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42 हजार 054 किलो पेक्षा जास्त अंमलीपदार्थ, 17 लाख 10 हजार 845 गोळ्या, 72 हजार 757 बाटल्या आणि खोकल्याच्या 16 हजार 336 इंजेक्शनच्या व्हायल्स नष्ट केल्या आहेत.
अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करीच्या विरोधात कडकपणे संदेश देण्यासाठी दि. 8 जून रोजी संपूर्ण देशभरात ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. देशात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करीविरूद्ध मजबूत संदेश देण्यासाठी देशभरातील आणि देशाबाहेरील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या ड्राइव्हमध्ये सहभाग नोंदवला.
पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांनी जप्त केलेल्या 2 हजार 439 किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचा समावेश होता.
“महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’, “एमआयडीसी’, रांजणगाव. डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका आणि डॉ. सोनाली काळे, समन्वयक, मुक्तांगण पुनर्वसन केंद्र, पुणे यांनीही या कारवाईत सहभाग नोंदवला. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यसनाधीनांचे पुनर्वसन करतात, अशा मुक्तांगण पुनर्वसन केंद्रातील समन्वयक आणि संस्थांच्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली आहे.





