‘मुस्लिमांना घुसखोर म्हणणारे आता हिंदू-मुस्लिममध्ये भेद…” ; ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Owaisi Attacks PM Modi । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जसजशी पुढे जात आहे, तसतशी उमेदवारांची वक्तव्येही प्रखर होत आहेत. त्यातच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पैसे आणि जास्त मुले असणारे वक्तव्य केले होते. मात्र काल त्यांनी आपल्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केला असल्याचे म्हटले. त्यांच्या याच विधानावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. यांनी आपल्या ट्विटमध्ये, “पीएम मोदींनी आपल्या भाषणात मुस्लिमांना घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना संबोधले होते. आता ते म्हणतोय की ते मुस्लिमांबद्दल बोलत नव्हते, त्यांनी हिंदू-मुस्लिम कधीच केले नाही.”
ओवेसी पुढे म्हणाले, “हे खोटे स्पष्टीकरण द्यायला इतका वेळ का लागला? मोदींचा राजकीय प्रवास केवळ मुस्लिमविरोधी राजकारणावर उभा आहे. या निवडणुकीत मोदी आणि भाजपने असंख्य खोटे आणि मुस्लिमांविरुद्ध प्रचंड द्वेष पसरवला आहे.” असे त्यांनी म्हटले. त्यासोबतच,”फक्त मोदीच नाहीत, तर त्यांच्या भाषणांना न जुमानता भाजपला मतदान करणार प्रत्येक मतदार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत.”
मोदी ने अपने भाषण में मुसलमानों को घुसपैठिया और ज़्यदा बच्चे वाला कहा था। अब वो कह रहे हैं कि वो मुसलमानों की बात नहीं कर रहे थे, उन्होंने कभी हिन्दू-मुस्लिम नहीं किया।
ये झूठी सफ़ाई देने में इतना वक़्त क्यों लग गया? मोदी का सियासी सफ़र सिर्फ़ और सिर्फ़ मुस्लिम विरोधी सियासत पर…
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 14, 2024
‘त्या’ विधानावर पंतप्रधानांचे उत्तर Owaisi Attacks PM Modi ।
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘घुसखोर’ आणि ‘जास्त मुले निर्माण करणे’ या त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी, ‘हे चुकीचे आहे, मी फक्त मुस्लिमांबद्दल बोललो नाही. मी प्रत्येक गरीब कुटुंबाबद्दल बोललो. पीएम मोदी असेही म्हणाले की, ‘मी ना हिंदू म्हटले ना मुस्लिम… ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम बोलू लागेन, तेव्हा सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईल, मी सर्वांना समानतेने पाहतो. हा माझा संकल्प आहे.” असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले? Owaisi Attacks PM Modi ।
तर 21 एप्रिल रोजी राजस्थानमधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जुन्या भाषणाचा हवाला देत मुस्लिमांवर भाष्य केले होते, ज्यात त्यांनी त्यांना ‘घुसखोर’ आणि ‘अधिक मुलांचे उत्पादक’ म्हटले होते. मात्र, पीएम मोदींच्या या वक्तव्यावर बराच वाद झाला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली.





