Nagar | यंदा नागरिकांमध्ये कोजागरीचा उत्साह शिगेला

नगर, (प्रतिनिधी) – यंदा नागरिकांमध्ये कोजागरीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बुधवारी केशर आणि दूध मसाल्याची विक्री वाढण्याचा वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनीही जय्यत तयारी केली आहे.
कोजागरी पौर्णिमाला यंदा याशिवाय २०० ते ३०० किलो दूध मसाला आणि २ किलो केशर विक्री झाली आहे. सर्वसामान्यांमध्ये कोजागरीचा उत्साह असून, शहरात विविध कॉलनींमध्ये नागरिकांनी कोजागिरी साजरी करण्याचे नियोजन केले होते.
रोजच्या पेक्षा १५ लिटर अधिक विक्रीचा अंदाज दररोज साधारणपणे ३० हजार लिटर दुधाची विक्री होते. कोजागिरीला यंदा १० ते १५ हजार लिटर अधिक दुधाची विक्री झाली आहे.
२ किलो केशर विक्रीची शक्यता २१० रुपये प्रति ग्रॅम या दराने केशरची विक्री होते. कोणागिरीला २ किलो केशर विक्रीतून ४ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. त्याबरोबरच दूध मसाला विक्रीतून १५ लाखांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. १०, २०, ५०, १०० ग्रॅमच्या पाकिटमध्ये दूध मसाला उपलब्ध आहे,
बनावट केशर कसा ओळखाल?
वास्तविक केशर पाण्यात विरघळत नाही. तसेच भिजल्यावर सोनेरी-पिवळा रंग सोडतो. तर नकली केशर विरघळतो आणि ताबडतोब रंग सोडतो, अनेकदा पाणी लाल होते.
अस्सल केशरला त्याचा रंग येण्यासाठी काही मिनिटे लागतात. अस्सल केशराला किंचित गोड आणि मातीची चव असते. मधासारखा सुगंध असतो. बनावट केशरची चव अनेकदा कडू असते आणि विशिष्ट सुगंध नसतो.


