यंदा देशात सर्वसाधारण पेक्षाही कमी पाऊस; स्कायमेट

नवी दिल्ली – शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे पाऊस. पण देशात यंदा सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता स्कायमेट या हवामान संस्थने वर्तवली आहे. त्यामुळे कमी पावसामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून याचा थेट फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा सरासरी ९३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरी ९० ते ९५ टक्के पाऊस हा सर्वसाधारण पेक्षाही कमी पावसाच्या श्रेणीमध्ये येतो. जर पाऊस कमी असेल तर शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. यामुळे आर्थिक स्थितीवरच नव्हे तर महागाईतही वाढ होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी सांगितले की, सर्वसाधारण पेक्षा कमी पावसामागे अल-निनोचा प्रभाव हे मुख्य कारण आहे. यापूर्वी स्कायमेटने सर्वसाधारणपेक्षा ५५ टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या वर्षी मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.