Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसणार ‘हा’ संघ

मुंबई : क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे ते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेकडे. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांमध्ये 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र या सगळ्यात एक आशियाई संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे. या संघाने मागच्या काही वर्षातील कामगिरीने सगळ्याना आश्चर्यचकित केले आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर अव्वल 7 संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले. तर पाकिस्तान यजमान असल्याने त्यांना थेट एन्ट्री मिळाली. हा नवा संघ कोणता? हे आपण जाणून घेऊयात.
अफगाणिस्तान क्रिकेट टीम
अफगाणिस्तान क्रिकेट टीमची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची यंदाची पहिलीच वेळ ठरणार आहे. अफगाणिस्तानची गेल्या काही वर्षांमध्ये तिन्ही फॉर्मेटमध्ये कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे. अफगाणिस्तानने अनेक मोठ्या संघाना पराभवाचा धक्का दिला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे.
अफगाणिस्तान बी ग्रुपमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अफगाणिस्तान बी ग्रुपमध्ये आहे. अफगाणिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा समावेश आहे. अफगाणिस्तानच्या एंट्रीमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांचे टेन्शन वाढणार हे मात्र नक्की…
अफगाणिस्तानचं वेळापत्रक
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शुक्रवार 21 फेब्रुवारी, कराची
विरुद्ध इंग्लंड, बुधवार 26 फेब्रुवारी, लाहोर
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शुक्रवार 28 फेब्रुवारी, लाहोर





