आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगलट – आमदार शिंदे

जळोची: कोणाच्याही सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा व कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. मग तो आमदार असो वा माजी मंत्री. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला स्टंट त्यांच्या अंगलट आला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार, प्रा. राम शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी आव्हाड यांच्या अटकेचे समर्थन केले.
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासमवेत शिंदे हे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, आपल्या देशात कायदा आहे. या कायद्याच्या अनुषंगाने सेन्सार बोर्डाने हर हर महादेव या चित्रपटाला मान्यता दिली आहे.
चित्रपटाला मान्यता असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते. अशी मारहाण होत असेल तर संबंधितांवर कारवाई होऊन अटक होणारच. जितेंद्र आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगलट आला आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.





