मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ‘या आमदाराचा जाहीर पाठिंबा; मराठा बांधवांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत.
मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत. अंतरावाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील सकाळी १० वाजता मुंबईसाठी रवाना झाले. अनेक गाड्या, दुचाकीसह जरांगेंच्या मोर्चात मराठा सामील झाले होते. संयमाने आंदोलन करण्याचा इशारा देत शेकडो शिलेदारांसह जरांगे पाटील आज मुंबईकडे निघाले.
संदीप क्षीरसागर यांनी जरांगेंची घेतली भेट
बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ जरांगे यांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला. त्याशिवाय आपण मुंबईपर्यंत तुमच्यासोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार म्हणून मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांच्यासोबत बोलणार असल्याचे देखील क्षीरसागर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना म्हंटले आहे.
संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील आमदार आहेत. त्यांनी पहिल्यापासूनच जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आताही आमदार संदीप क्षीरसागर हे मनोज जरांगे यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. Manoj Jarange Patil |
हेही वाचा:
राज ठाकरेंच्या घरी गणरायाचे आगमन; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच येणार ‘शिवतीर्था’वर




