“ह्या माणसानी देशाचे वाटोळे केले…”; जितेंद्र आव्हाडांची अण्णा हजारेंवर जहरी टीका

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे अण्णा हजारे (Anna Hazare) सध्या चर्चेत असल्याचे दिसत नाही. 2011 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर त्यांनी आंदोलन केले होते. मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात एकही शब्द काढला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनीही अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. ट्वीटद्वारे आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो शेअर करत खोचक टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीट –
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही.’ मात्र अण्णा हजारे यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी नेमके कोणत्या कारणामुळे टीका केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु अनेकजण या पोस्टचा संबंध अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर केलेल्या आंदोलनाशी जोडला जात आहे.
अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये मोठे आंदोलन केले होते. त्यांनी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी यूपीए सरकारकडे लोकपाल कायदा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर देशभरात काँग्रेसविरोधात वातावरण तयार झाले होते. यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे.
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले
टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही pic.twitter.com/hDLIsSW8g9— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023
याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, यावर अण्णा हजारे कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. मात्र भाजप सरकारच्या काळात त्यांनी मौन बाळगल्याने अनेकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली आहे. याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.





