तिसऱ्या दिवशीही निलेश लंकेंचे आंदोलन सुरू; सुप्रिया सुळे यांच्यासह ‘हे’ नेते देणार भेट

Nilesh Lanke Protest | निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दूध दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे ‘शेतकरी जन आक्रोश’ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनात लंके यांच्यासह शेतकरी व कायकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचव्यावात अशी भूमिका निलेश लंके यांनी घेतली आहे. यानंतर आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. तर उद्या खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील भेट देणार आहेत. Nilesh Lanke Protest |
राज्यातील शेतकऱ्यांत दूध आणि शेतीमालाच्या हमीभावावरून प्रचंड असंतोष आहे. अनेक शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. दूध दरवाढीबाबात शासनाने कायमस्वरूपी कायदा करावा. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दूधाला ४० रुपये दर मिळावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व कांदा आणि इतर शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा.
राज्यातील मंत्री शेतीमाल तसेच दुधाबाबत गंभीर नाहीत. केंद्रीय गृहमंत्री आणि दूध दरवाढीचा काय संबंध, हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला होता. दूध, कांदा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लवकर निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिला होता.
आंदोलनात निलेश लंकेंच्या पत्नीचाही सहभाग Nilesh Lanke Protest |
दरम्यान, निलेश लंके आंदोलन करत असताना त्यांच्या पत्नी राणी लंके या देखील आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी आंदोलनस्थळी चुलीवर स्वंयपाक करत सरकारचा निषेध केला आहे.
हेही वाचा:
अमरावती मध्यवर्ती कारागृहात मोठा स्फोट ; रात्री दोन कारागृहाबाहेर स्फोट





