“…हे चुकीचं आहे”; अर्जुन कपूर पापाराझींवर संतापला

Arjun Kapoor Video | अभिनेता अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो पापाराझींवर संतापलेला पाहायला मिळाला. ‘स्काय फोर्स’ च्या स्क्रीनिंग दरम्यान त्याने हजेरी लावली होती. त्यादरम्यान पापाराझींनी त्याचा फोटो घेण्यासाठी सर्व बाजूंनी गर्दी केली होती. यावेळी फोटोग्राफरच्या वागणुकीबद्दल अर्जुनने संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर ‘स्काय फोर्स’च्या प्रिमियरदरम्यानचा व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते की, अर्जुन सिनेमा पाहण्यासाठी येतो. तेव्हा समोर उभे असलेले पापाराझी आणि मीडिया गडबड करताना दिसतात. त्यामुळे अर्जुनलाही धक्काबुक्की होते.
त्यावेळी अर्जुन पापाराझींवर सांगतो की, “मला उशीर झाला हे मी तुम्हाला सांगितलंय त्यात तुम्ही धक्काबुक्की करताय. हे चुकीचं आहे ना?” असं म्हणत वैतागून अर्जुन निघून जातो. या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर चांगलाच संतापलेला दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून अर्जुनला समर्थन दिलं असून पापाराझींच्या वर्तवणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. Arjun Kapoor Video |
View this post on Instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अर्जुन नुकताच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अजय देवगण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, श्वेता तिवारी आणि करीना कपूर खान यांसारखे कलाकारही होते. यानंतर आता अर्जुन भूमी पेडणेकरसोबत ‘मेरे हसबंड की बिवी’ चित्रपटात दिसणार आहे. Arjun Kapoor Video |
हेही वाचा:





