Kapil Sibal Vs Rajnath Singh: “हीच सत्ता सोडण्याची योग्य वेळ” कपिल सिब्बल यांचा राजनाथ सिंग यांना टोला
Kapil Sibal Vs Rajnath Singh : सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर

Kapil Sibal Vs Rajnath Singh: राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या सत्ता परिवर्तनाच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. सिब्बल म्हणाले की, जनताच सत्ता परिवर्तन करु इच्छिते आणि आता या सरकारची जाण्याची वेळ आली आहे.
राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर जोरदार टीका केली होती. दिल्लीत कथित निवडणूक अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंग यांनी आरोप केला की, हे लोक बांगलादेशच्या धर्तीवर सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून ‘अराजकता’ पसरवत आहेत. लोकशाहीत कोणालाही गोंधळ निर्माण करण्याचा किंवा घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा परवाना मिळालेला नाही.
Rajnath Singh :
You allege that Congress wants “regime change” the Bangladesh route
No. People want “regime change”
Protests with slogan “India against corruption” brought you power
Then :
You embraced corruption
Captured institutions
Manipulated voters listTime to go !
— Kapil Sibal (@KapilSibal) October 17, 2026
कपिल सिब्बल यांचे प्रत्युत्तर
त्यावर सिब्बल म्हणाले, “राजनाथ सिंगजी तुमचा आरोप आहे की काँग्रेसला बांगलादेशच्या धर्तीवर सत्ता परिवर्तन घडवून आणायचे आहे. तर तसे नाही, जनताच सत्ता परिवर्तन करु इच्छिते. इंडिया अगेन्स्ट करप्शन (भ्रष्टाचाराविरुद्ध भारत) या घोषणेसह झालेल्या आंदोलनांमुळेच तुम्ही सत्तेत आला होतात. त्यानंतर, तुम्ही स्वतःच भ्रष्टाचाराला जवळ केले, संस्थांवर ताबा मिळवला आणि मतदार याद्यांमध्ये फेरफार केली. आता तुमची वेळ निरोपाची आहे,” असे म्हणत त्यांनी राजनाथ सिंह यांना टोला लगावला आहे. राजनाथ सिंह यांच्या या आरोपांनंतर कपिल सिब्बल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर वक्तव्यामुळे सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
हेही वाचा:
Sahar Shaikh : ‘हिरवा आणि भगवा दोन्ही करू’; सहर शेखच्या नव्या वक्तव्याची चर्चा





