‘हा तर निचपणाचा कळस’ रोहित पवार शिंदे सरकारवर संतापले केली, ‘मोठी मागणी’

Shivaji Maharaj statue collapsed । टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० % वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५ % वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची असा नवा गोरखधंदा या सरकारने सुरु केला असून ५०००० कोटीची दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली आहेत. अस सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी महायुती सरकार टीका केली आहे.
सोमवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर सात महिन्यांपूर्वी उभारलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. पुतळा कोसळल्यानंतर आता राजकारण तापले आहे. सर्वच स्तरातून शिंदे सरकारच्या कामावर निशाणा साधण्यात येत आहे.
#टेंडरबाज, #दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० % वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५ % वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची असा नवा #गोरखधंदा या सरकारने सुरु केला असून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 27, 2024
यावरून रोहित पवार यांनीही पोस्ट करत टीका केली आहे.पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,’ एकीकडं कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडं तिजोरी खाली असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आलीय. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर येऊन ठेपलंय. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडं पाठ फिरवलीय. #महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणं गरजेचं असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणं खूप कठीण होऊन बसेल.असं म्हणत सरकारवर रोहित पवार यांनी गंभीर आरोप लगावले आहे.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदार जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




