हे खरच सरकार नाही सर्कस आहे – नितेश राणे

मुंबई – मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या 48 तासांच्या आता स्थगित करण्याची सरकारवर नामुष्की ओढविली आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

नितेश राणे म्हणाले कि, नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते??मात्र कांग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरच सरकार नाही CIRCUS आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

दरम्यान, 2 जुलै रोजी मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या मुंबई अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. तीन दिवसानंतरच या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.