नुकतंच 24 ऑक्टोबर रोजी नेहा कक्कर रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत. यांचा दोघांचा विवाह सोहळा देखील मोठ्या उत्सवात पार पडला असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nयातच नुकतीच नेहा कक्कर बद्दल आणखी एक मोठी बातमी समोर आली होती. नेहा लवकरच आई होणार असून तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सध्या तुफान चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात होते. मात्र या चर्चांवर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
नेहाने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत असून तिचा हा फोटो नव्या गाण्याचा एक भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या नव्या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एक नवीन चर्चा सुरु झाली आहे.
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nयापूर्वीच्या तिच्या पोस्ट मध्ये नेहाचं बेबीबंप दिसत असून, फोटोला “खयाल रखा कर’ असं कॅप्शन दिलं गेलं आहे. या फोटोला नेहाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल” अशी कमेंट रोहनप्रीतने केली होती.