Actress Taapsee Pannu : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या करिअरविषयी भाष्य करताना मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तापसीने इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचे तिचे कारण आणि ती चित्रपटाची निवड करताना कोणती काळजी घेते याविषयी सांगितले आहे. अभिनेत्री तापसी पन्नूचा चाहतावर्ग मोठा असून, ती तिच्या अभिनय आणि वेगवेगळ्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. याशिवाय तिची बेधडक वक्तव्य देखील चर्चेत असतात. तापसी नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले विचार प्ररखडपणे मांडत असते. अनेकांना तिच्या विचार पटतात तर काही तिच्या विचारांशी अहसमती देखील दर्शवतात. काही चित्रपट फ्लॅाप दिल्यानंतर तापसीला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. त्यानंतर तिने चित्रपट निवडताना काळजी घेत माझे ह्रदय आणि माझे मन पूर्णपणे मी जे सादर करत आहे. ज्यामध्ये मी गुंतलेले असते. अशाच चित्रपटांची निवड करते म्हणून आता मी फक्त माझ्या मनाचे ऐकते, असे ती म्हणाली. चित्रपट निवडताना, असे प्रोजेक्ट निवडत नाही जे फक्त माझे बँक खाते वाढवतात, तर मी आता असे प्रोजेक्ट निवडते जे माझ्या अभिनयाला चालना देतात. त्यामुळे मी सध्या एक नवीन मार्ग निवडला आहे ज्यावर अनेक लोक चालत नाहीत, असे देखील तापसी म्हणाली. अभिनेत्री तापसी पन्नूने अनेक लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. तिने प्रत्येक भूमिकांना न्याय देण्याचाच प्रयत्न केला आहे. तिने कबूल केले की तिने स्वतःची कार्यप्रणाली तयार केली असून, त्यानुसार ती काम करते. अभिनेत्रीच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास ती शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खेल खेल में’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती लवकरच ‘वो लडकी है कहां?’, ‘गांधारी’ आणि ‘दुर्गा’ या चित्रपटात दिसणार आहे. हेही वाचा : कोलकात्यात गोंधळ ! निवडणूक धोरण कंपनी आयपॅकच्या कार्यालयांवर ईडीचे छापे ; ममता बॅनर्जी जाऊन म्हणाल्या, ‘गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार…’