Huma Qureshi : अभिनेत्री हुमा कुरेशीने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे. तिच्या ‘महाराणी’ या अत्यंत लोकप्रिय झालेल्या सिरीजमधील महाराणी या पात्राचे खूप कौतुक करण्यात आले. हुमा तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. नुकतीच तिने इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. अभिनेत्रींना पुरुष अभिनेत्यापेक्षा मानधन कमी का मिळते? असा सवाल उपस्थित करून यावर प्ररखड भाष्य केले आहे. नुकतीच हुमा कुरेशीने इंडिया टुडेला मुलाखत दिली. ‘महाराणी’ ही मालिका सर्वाधिक पाहिली गेली असूनही, तिला पुरुष कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळाले. चित्रपटांमध्येही हे घडते, ओटीटीवरही तेच दृश्य आहे, असे प्ररखड मत तिने व्यक्त केले. याबाबत उदाहण देताना हुमा म्हणाली ओटीटीवर काम करणाऱ्या प्रसिद्ध कलाकारांना सुमारे ४५ कोटी रुपये फी मिळते, पण अभिनेत्रींना तेवढी फी मिळत नाही. ‘हे सगळं असंच आहे, असेही ती म्हणाली. हुमा कुरेशीला आशा वाटते की संवाद आणि चर्चेतून ही परिस्थिती बदलेल, असे देखील ती म्हणाली. ओटीटीमधील फीमधील फरकाबद्दल बोलण्याव्यतिरिक्त, हुमा कुरेशीने या प्लॅटफॉर्मचे कौतुक देखील केले. हुमाचा असा विश्वास आहे की, या व्यासपीठाने जयदीप अहलावत, शेफाली शाह आणि तिच्यासाठी नवीन दरवाजे उघडले आहेत. आता हुमा कुरेशी आणि हे कलाकार चांगल्या कथांचा भाग बनत आहेत. हुमा कुरेशीच्या ‘महाराणी’ मालिकेचा चौथा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, यामध्येही ती पुन्हा एकदा राणी भारतीच्या भूमिकेत दिसणार आहे. अपकमिंग प्रोजेक्ट ‘महाराणी ४’ या वेब सिरीजव्यतिरिक्त, हुमा कुरेशीकडे काही चित्रपटांच्या ऑफर देखील आहेत. ती ‘टॉक्सिक’, ‘पूजा मेरी जान’ आणि ‘गुलाबजाम’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘टॉक्सिक’ हा एक कन्नड चित्रपट असून ज्यामध्ये ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश मुख्य भूमिकेत आहे.