Chandgude Case : ….हीच गोष्ट पत्नी संगीताला खटकली; कुणालच्या आत्याचा शॅाकिंग खुलासा
Chandgude Case : गेल्या १७ वर्षापासून चांदगुडे कुटूंबातील दुरावा आता कमी होत होता यामुळे मुरलीधर आणि संगिता यांच्यात सतत वाद होत होता, अशी माहिती कुणालची आत्या शोभा म्हसके यांनी दिली आहे.

Chandgude Case : छत्रपती संभाजीनगर येथील चांदगुडे कुटुंबातील आई वडील आणि मुलगा यांचा खवड्या डोंगरावरुन कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणात सातत्याने नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात चांदगुडे कुटुंबातील नात्यांवाईकांकडून धक्कादायक खुलासा केले जात आहेत. या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी कुणालच्या आत्याने धक्कादायक खुलासा केला आहे.
कुणालने आईफोनसाठी आपल्या आयुष्याचा शेवट केला अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, हे जीवन संपवण्याचे कारण नसून चांदगुडे कुटुंबातील अंतर्गत कलह वाद असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपास समोर आले आहे. गेल्या १७ वर्षापासून चांदगुडे कुटूंबातील दुरावा आता कमी होत होता यामुळे मुरलीधर आणि संगिता यांच्यात सतत वाद होत होता, अशी माहिती कुणालची आत्या शोभा म्हसके यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाली आत्या?
शोभा मस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता आणि मुरलीधर यांच्या नात्यात चार महिन्यापासून खटके उडत होते. मुरलीधर हा चार महिन्यापूर्वी एका भाच्याच्या लग्नाला आला, मात्र संगीता उपस्थित नव्हती. लग्नाच्याच दुसऱ्या दिवशी मधल्या बहिणीच्या मुलाचे अचानक निधन झाले. त्यामुळे मुरलीधर दहा दिवस थांबले होते, हीच गोष्ट पत्नी संगीताला खटकली. यानंतर संगीताने माझ्या भावाला घरातून बाहेर काढले, असा धक्कादायक खुलासा कुणालच्या आत्याने केला आहे.
आई-वडिलांनी एकत्र राहावे अशी त्याची इच्छा होती
चांदगुडे कुटुंबातील तणाव वाढला होता, याचाच परिणाम कुणालवर होत होता. आई वडिलांच्या वादामुळे तो खचला होता. आई वडिलांनी एकत्र राहावे अशी त्याची इच्छा होती असा दावा नातेवाईकांनी केला आहे. तर मुरलीधर यांनी सुमारे १० वर्षे चालक म्हणून काम केले होते आणि त्यांच्याविरुद्ध कधीही कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती. ते सद्गगृहस्थ होते, असेही काहीजण सांगत आहेत.
कौटुंबिक कलहचा अँगल समोर
संगीता चांदगुडे यांचा स्वतःचा यू ट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर त्यांनी अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. या व्हिडिओतील एका व्हिडिओत त्यांनी नणंदेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या बोलण्यानुसार त्यांनी संपत्तीवर भाष्य करताना नणंदेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कौटुंबिक कलहचा अँगल समोर आला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं होतं?
कुणाल चांदगुडे हा १९ वर्षीय तरुण अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्याला दहावीला ९२ टक्के गुण मिळाले होते. त्याला डॅाक्टर व्हायचे होते. त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली होती. ज्या दिवशी घटना घडली होती त्याच्याअगोदर भांडण झाल्याचा दावा केला जात असून त्यानंतर कुणालने टोकाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तो खवड्या डोंगरावर गेला. याची माहिती आई वडिलांना मिळल्यानंतर तेही तिथे गेले. त्याच्या आई-वडिलांनी त्याला समजावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र तो काहीच ऐकायला तयार नव्हता. अखेर वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र हाच प्रयत्न दोघांच्या जीवावर बेतला आणि दोघेही डोंगरावरुन खाली कोसळले. हे दृश्य पाहून संगीता यांनीही डोंगरावरुन उडी मारून आपला जीव दिला.
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार खास भेट; खात्यात जमा होणार 1500 रुपये





