women’s reservation bill – महिला आरक्षण सुधारणा विधेयकाची वेळ आणि ते हाताळण्याची पद्धत यावरून डी. के. शिवकुमार यांनी रविवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विरोधकांना विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेसने महिला आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला असला तरी, पुरेशा विचारविनिमयाशिवाय ज्या पद्धतीने हे विधेयक मांडले गेले, त्यावर आपला आक्षेप असल्याचे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. pm modi ही लोकशाही आहे; ही काही हिटलरशाही नाही. निवडणुका सुरू असताना मध्येच हे विधेयक आणून, संपूर्ण मतदारसंघांची रचना बदलण्याचा प्रयत्न त्यांना करता येणार नाही, असे शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अधिक व्यापक लोकशाही सहभागाची गरज व्यक्त करत ते म्हणाले, सरकारने सर्वांना विश्वासात घेणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. म्हणूनच विरोधी पक्षांनी अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यामुळे, हा इंडिया आघाडीचा विजय आहे.