आज भारत विरद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याकडे फक्त भारत आणि पाकिस्तानच नाहीतर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. 34 वर्षीय शमीने या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षभरानंतर पुनरागमन केले. शमीच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम मोहम्मद शमीने टाकलेल्या पहिल्या षटकात ११ चेंडू टाकले. शमीने टाकलेलं षटक चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातलं दुसरं सगळ्यात मोठं षटक ठरलं. २०१७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध जसप्रीत बुमराहने टाकलेल्या षटकात ९ चेंडू होते. शमीने या षटकात चार वाईड टाकले. दुबईतल्या प्रचंड उष्णतेचा परिणाम त्याच्या शरीरावर जाणवला. षटक संपल्यानंतर शूज बदलण्यासाठी शमी ड्रेसिंगरुममध्ये परतला. टीम इंडियासमोर 242 धावांचे आव्हान टीम इंडियाने पाकिस्तानला 3 चेंडूंआधी ऑलआऊट केलं. पाकिस्तानला 49.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 241 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळांलं आहे. भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव पाकिस्तानची प्लेईंग 11 : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद