Pimpari Chanchwad : पिंपरी चिंचवड महापालिकेला सुनेत्रा पवारांनी भेट दिल्यानंतर रंगू लागलीये ‘ही’ चर्चा

पिंपरी-चिंचवड: गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरीच चिंचवड महापालिकेला अचानक भेट दिली. त्यांनी पालिकेला सरप्रायजिंग भेट दिल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या. यानंतर सुनेत्रा पवार यांनी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत त्यांच्यासमेवत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरात भेडसवणाऱ्या विविध प्रशांविषयी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यानंतर शहरातील राजकारणात एक वेगळची चर्चा रंगू लागली आहे. सुनेत्रा पवार यांनी शहरातील राजकाणात लक्ष घातल्याचे बोलले जात आहे.
महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी निधी द्यावा, प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना आयुक्तांना केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षातील माजी नगरसेवकांनी भाजपच्या आमदारांकडून प्रशासनावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे होऊ नयेत, यासाठी दबाव आणला जातो. भाजप नेत्यांबरोबर महापालिका प्रशासन बैठका घेते. यामुळे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यानंतर याविषयी त्यांनी पक्षाच्या झालेल्या बैठकीत याबाबत सांगितले, अशी माहिती आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार महापालिकेत आल्या असल्याची माहिती आहे.
आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री. शेखर सिंह व राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची व समस्यांची दखल घेऊन आयुक्तांना त्यावर उपाययोजना… pic.twitter.com/OkxHdLJboH
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) March 6, 2025
आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री. शेखर सिंह व राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची व समस्यांची दखल घेऊन आयुक्तांना त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार
शहरातील राजकाणात पार्थ पवार सक्रिय?
पिंपरी चिंचवड महापालिकेवर १५ वर्ष राष्ट्रवादीची सत्ता राहिलेले आहे. राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतरही शहरात अजित पवार यांची ताकद कायम आहे. त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पण ते येथून पराभूत झाले होते. पराभव झाल्यानंतरही पार्थ यांनी येथील राजकारणात लक्ष घातले होते. मात्र, आता काही दिवसांपासून पार्थ यांचे लक्ष कमी झाल्याची चर्चा आहे.





