नवी दिल्ली – तुर्कीमध्ये सोन्याचं मोठं घबाडंच सापडल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सापडलेल्या या सोन्याचं वजन तब्बल 99 टन इतकं आहे. तर या सोन्याची किंमत तब्बल 6 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 44 हजार कोटी रुपये आहे. या सोन्याची किंमत जगातील अनेक देशांच्या GDPहून जास्त आहे.
सोन्याचा हा खजिना तुर्कीमधील सोगट या पश्चिम-मध्य भागात सापडला आहे. ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह ऑफ तुर्की आणि गुब्रेटस फर्टिलायझर प्रॉडक्शनचे प्रमुख असलेल्या फहरेतीन पोयराझ यांनी ही माहिती दिली आहे.
सोन्याचा हा खजिना दोन वर्षात उत्खनन करुन काढला जाईल. या त्यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था वाढवण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. गुब्रेटस फर्टिलायझर प्रॉड्यूसर फर्म या कंपनीनं 2019 मध्ये एका दुसऱ्या कंपनीकडून ही साईट मिळवली होती.
तुर्कीमध्ये सापडलेल्या सोन्याच्या खाणीची बातमी पसरल्यानंतर गुब्रेटसचे शेअर्स तब्बल 10 टक्क्यांनी वधारले आहेत.