शिक्रापूर -तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील 45 वर्षीय करोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर पुण्यात उपचार सुरू असताना त्याची करोना चाचणी करण्यात आली होती.
त्यावेळी अहवाल पॉझिटिव्ह आला.त्याच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तळेगाव ढमढेरे येथील करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आता तीन झाली आहे.