प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात तिसऱ्यांदा भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली : देशात सध्या तिसऱ्या आघाडीचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. कारण दिल्लीत एकीकडे शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमुळे याला दुजोरा मिळत आहे. दरम्यान हे होत असतानाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज पुन्हा एकदा भेटीला शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

शरद पवार सध्या दिल्लीत असून प्रशांत किशोर पुन्हा एकदा आज  पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील गेल्या ४८ तासांतील ही दुसरी भेट असून १५ दिवसांतील तिसरी भेट आहे. या भेटींमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रशांत किशोर यांनी सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून, दिल्लीतील पवार-किशोर यांच्या भेटीने या चर्चेला उधाण आले  होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.