Nandur News : नांदूर गावामध्ये चोरांचा सुळसुळाट
Updated On:

नांदुर : नांदूर (तालुका दौंड) या ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांकडून घर फोडी करण्यात आली आहे. एकीकडे पावसाचे थैमान त्यामध्ये दिवाळी सुरू होण्यापुर्वीच या भागामध्ये चोरट्यांचे चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
यवत पोलिस ठाणेअंतर्गत समाविष्ट असलेल्या काही गावांमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. बोरीऐंदी ( ता दौंड) गावानंतर आता नांदुर (ता दौंड) या गावात दि २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरी करण्यात आली आहे. या परिसरामध्ये सध्यातरी भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे, तरी देखील यवत पोलीस स्टेशन अंतर्गत लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करावी ही गावकऱ्यांची विनंती आहे.





