अहमदनगर | मंगलगेट येथे किराणा दुकान चोरट्यांनी फोडले

नगर – मंगलगेट येथील ए. एम. ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी ३३ हजाराचे सिगारेटचे बंडल व १२ हजार रूपयाची रोकड असा ४५ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. सोमवारी (दि.२६) रात्री 10 ते मंगळवारी (दि.२७) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
या प्रकरणी बुधवारी (दि.२८) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुलमुनाप अल्लाउद्दीन पठाण (वय 23 रा. कोठला) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी सोमवारी रात्री १० वाजता त्यांचे किराणा दुकान व्यवस्थित बंद केले होते.
ते मंगळवारी सकाळी 10 वाजता दुकानात आले असता त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. दुकानाचा पत्रा उचकाटलेला दिसला. त्यांनी दुकानातील सामानाची पाहणी केली असा 33 हजार रूपये किमतीचे सिगारेटचे बंडल व 12 हजाराची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी बुधवारी दुपारी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.





